
सोलापूर : अत्याचारातील पीडित मुली, तरुणी, बालके व महिलांना शासनाच्या मनोधैर्य योजनेतून आर्थिक मदत आणि समुपदेशनातून मानसिक आधार दिला जातो. सोलापूर जिल्ह्यातील ९९ अत्याचार पीडितांना मागील साडेचार वर्षात ‘मनोधैर्य’मधून तब्बल एक कोटी ११ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे.