Solapur Crime: पर्समधील दहा तोळ्यांचे दागिने केले लंपास; वास्तुशांतीनंतर माहेरीहून मुंबईला जाण्यासाठी निघाल्या अन्..
वास्तुशांतीनंतर माहेरी बेंबळी येथे गेले व तेथून धाराशिव ठाणे या बसने मुंबईला जाण्यासाठी निघाले असताना, बार्शी बसस्थानकावर बस आली त्यावेळी पर्स उघडी दिसली व त्यामध्ये ठेवलेली दहा तोळे दागिन्यांची डबी चोरट्याने लंपास केल्याचे समजले असे फिर्यादीत म्हटले.
The woman’s purse from which gold jewellery worth 10 tolas was stolen while traveling back to Mumbai after a housewarming event.Sakal
बार्शी : धाराशिव ते बार्शीदरम्यान प्रवास करत असताना महिलेच्या पर्समधील प्रत्येकी ५ तोळ्याच्या बिलवरी बांगड्या व पाटल्या असे दहा तोळे दागिने ठेवलेली डबी चोरट्यांनी लंपास केली. बार्शी शहर पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला आहे.