
बार्शी: शहरातील एका अल्पवयीन मुलीस तुझे तुझ्या मित्रासमवेत प्रेमसंबंध असल्याचे तुझ्या घरी सांगेन, अशी धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस दहा वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा बार्शी जिल्हा व सत्र न्यायाधीश विक्रमादित्य मांडे यांनी सुनावली.