solapur
solapursakal

Solapur : मध्य रेल्वेला आठ महिन्यांत १२ हजार कोटींचा महसूल

गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रवासी वाहतुकीच्या आकड्यात १०.४६ टक्क्यांची वाढ झाली आहे. आठ महिन्यात प्रवासी वाहतुकीतून रेल्वेला ४ हजार ६९९ कोटी १० लाख रुपये मिळाले आहेत.

सोलापूर : मध्य रेल्वेने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ८ महिन्यांत (एप्रिल ते नोव्हेंबर) १२ हजार ४९७ कोटी ४१ लाख रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. गेल्या वर्षी याच आठ महिन्यात १० हजार ८४८ कोटी ८९ लाख रुपयांचा महसूल होता. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा १५.२० टक्क्यांची वाढ झाली आहे.

मध्य रेल्वेने या आठ महिन्यात १,०३९.२० दशलक्ष प्रवाशांची वाहतूक केली. गेल्या वर्षी या आठ महिन्यात ९४०.७८ दशलक्ष प्रवाशांची वाहतूक केली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रवासी वाहतुकीच्या आकड्यात १०.४६ टक्क्यांची वाढ झाली आहे. आठ महिन्यात प्रवासी वाहतुकीतून रेल्वेला ४ हजार ६९९ कोटी १० लाख रुपये मिळाले आहेत. गेल्या वर्षी या आठ महिन्यात ४ हजार ७७ कोटी ६२ लाख रुपयांचा महसूल मिळाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १५.२४ टक्क्यांची वाढ झाली आहे.

या आठ महिन्यात वस्तू व सामानाच्या वाहतुकीतून ६ हजार १४६ कोटी ८३ लाखांचा महसूल मिळाला आहे. इतर कोचिंग, सामान, नॉन-फेअर महसूल तसेच विविध माध्यमांतून (विविध, पार्किंग, केटरिंग, विश्रामगृह, शौचालय वापर इत्यादीसह) यंदा १ हजार ६५१ कोटी ४८ लाखांचा महसूल मिळाला आहे. मध्य रेल्वेने उत्पन्नाला चालना देण्यासाठी विभागवार व्यवसाय विकास केंद्रांची (बीडीयू) स्थापना केली आहे. इतर भाडे व्यतिरिक्त महसूल उपक्रम आणि मुख्यालय कार्यालयातील विपणन व इतर तत्सम नावीन्यपूर्ण कल्पनांमुळे महसुलात वाढ झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com