
पंढरपूर : आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने शहरांमध्ये मोकाट फिरणाऱ्या जनावरांना पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. बुधवारपर्यंत (ता. २५) एकूण १२० मोकाट जनावरांना पकडून त्यांची रवानगी कोंडवाड्यात करण्यात आली आहे, अशी माहिती पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांची "सकाळ"शी बोलताना दिली.