
सोलापूर : जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७७७ शाळा असून, २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात त्या शाळांमध्ये एक लाख ८६ हजारांपर्यंत विद्यार्थी प्रवेशित होते. पण, २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात दोन लाखांपर्यंत पोचलेली पटसंख्या तीन वर्षांत १२ हजारांनी कमी झाली. त्यामुळे यंदा सुमारे ७०० शिक्षक अतिरिक्त होत आहेत. आगामी शैक्षणिक वर्षात अशी स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकांना सध्याच्या पटसंख्येत १० टक्के वाढ करण्याचे निर्देश दिले आहेत.