
सोलापूर : अनुकंपा भरती प्रक्रियेतून गुरुवारी (ता. २४) जिल्हा परिषदेत १२४ जणांना नोकरी मिळाली. अनुकंपा भरतीसाठी प्रतीक्षा यादीतील अनुक्रमांक एक ते १४० उमेदवारांना बोलविण्यात आले होते. यापैकी १२४ उमेदवारांना समुपदेशनाने तात्काळ पदस्थापना व नियुक्तीपत्र देण्यात आले. पारदर्शकतेमुळे या भरती प्रक्रियेत पात्र उमेदवारांना न्याय मिळाल्याची भावना अनुकंपाधारक उमेदवारांनी व्यक्त केली.