
करमाळा: करमाळा शहरात बँकेत पैसे काढण्यासाठी येणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवून पैसे लुटणारी टोळी सक्रिय झाली असून, अंजनडोह (ता. करमाळा) येथील दूध डेअरी चालक दीपक सुभाष शेळके (वय ३२) यांची युनियन बँकेतून पैसे काढताना लक्ष ठेवून सव्वा लाखांची बॅग चोरट्यांनी लंपास केली आहे.