
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीवरील नऊ ठिकाणच्या वाळू लिलावासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या प्रक्रियेत १३ ठेकेदारांनी सहभाग घेतला आहे. यातील पात्र व अपात्र ठेकेदारांची प्रक्रिया उद्या (गुरुवार, ता. २६) केली जाणार आहे. वाळू लिलावासाठी पात्र ठरलेल्या ठेकेदारांची यादी शुक्रवारी (ता. २७) प्रसिद्ध केली जाणार आहे. माढा तालुक्यातील तीन वाळू स्थळासाठी राबविलेल्या प्रक्रियेत कोणीही सहभाग न घेतल्याने शुक्रवारपर्यंत (ता. २७) मुदतवाढ देण्यात आली आहे.