Karmala News : 13 टेबलवरती 7 फे-यात मतमोजणी

करमाळा तालुक्यातील 28 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीची मोजणीसाठी 13 टेबल वरती मतमोजणी करण्यात येणार
13 tables for vote counting in 7 rounds of 28 gram panchayat elections Karmala  politics
13 tables for vote counting in 7 rounds of 28 gram panchayat elections Karmala politics

करमाळा : करमाळा तालुक्यातील 28 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीची मोजणीसाठी 13 टेबल वरती मतमोजणी करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार समीर माने यांनी दिली आहे.एकुण 27 सरपंच पदासाठी तर 28 गावांमधुन 159 ग्रामपंचायत सदस्यपदासाठी मतमोजणी होत आहे. मतमोजणी मंगळवारी (ता. 20) तहसील कार्यालय येथे होणार आहे. सकाळी साडेआठ वाजता मतमोजणी सुरु होणार असून 13 टेबलवर 7 फेऱ्यातही मतमोजणी होणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचाही कडक बंदोबस्त असणार आहे. संवेदनशील व अतिसंवेदनशील गावामध्ये बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी दिली आहे.

एका फेरीला 4 ग्रामपंचायतीची मतमोजणी करण्यात येणार आहे एकूण सात फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण होणार आहे.मतमोजीसाठी एका टेबलला 2 असे एकूण 24  अधिकारी नेमण्यात आले आहेत. सकाळी साडेआठ वाजता मतमोजणी सुरू होईल.शेवटच्या फे-यामध्ये वाशिंबे, जिंती,दहीगांव,शेवगांव (वा) या संवेदनशील गावांची मतमोजणी होणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे. मतमोजणी होण्याच्या आदल्या दिवशीच सर्व गावांमध्ये पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक  विशाल हिरे यांनी दिली आहे.

मतमोजणी होणारी गावे

वरकटणे, पोफळज, शेलगाव वा., दहिगाव, खडकी, तरटगाव, कामोणे, पोन्धवाडी, अंजनडोह, मोरवड, विहाळ, मांजरगाव, टाकळी, कात्रज, पोमलवाडी, कोंढारचिंचोली, खातगाव, पारेवाडी, गोयेगाव, रिटेवाडी, सोगाव, वाशिंबे, कुंभारगाव- घरतवाडी, भिलारवाडी, हिंगणी, देलवडी, दिवेगव्हाण , जिंती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com