

Solapur BOT Project Failure: Bankruptcy of Contractor Firm Halts Development
Sakal
सोलापूर : बाळीवेस येथील महापालिकेंतर्गत असलेल्या बीओटी प्रकल्पाचे काम चौदा वर्षांपासून अर्धवट स्थितीत आहे. १४ वर्षांमध्ये संबंधित मक्तेदार मंत्रीचंडक कन्स्ट्रक्शन कंपनीवर महापालिकेने कोणतीही कारवाई केली नाही. आता कंपनी दिवाळखोरीत निघाल्याचे सांगून महापालिका जागा ताब्यात घेत आहे. १५ वर्षात संबंधित मक्तेदारावर कारवाई का झाली नाही? या दरम्यान महापालिकेचे कोट्यवधींचे नुकसान झाले याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.