esakal | अक्कलकोट तालुक्‍यात एकाच गावात सुमारे 144 जणांवर गुन्हा 
sakal

बोलून बातमी शोधा

150 citizens FIRs were registered in Akkalkot taluka

मोठा जमाव गोळा करून रथ ओढला व पोलिस हे रोखत असताना पोलिसांवर दगडफेक करून सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. याची फिर्याद पोलिस निरीक्षक के. एस. पुजारी यांनी उत्तर पोलिस ठाण्यात दिली. रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्कलकोट तालुक्‍यात एकाच गावात सुमारे 144 जणांवर गुन्हा 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अक्कलकोट (सोलापूर) : तालुक्‍यातील वागदरी येथील यात्रेत पोलिस निरीक्षक, तीन पोलिसांना व एका होमगार्डला जखमी केल्याबद्दल 44 व्यक्ती व 100 अज्ञात अशा सुमारे 144 लोकांवर उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी 22 जणांना अटक करण्यात आली असून त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. मोठा जमाव गोळा करून रथ ओढला व पोलिस हे रोखत असताना पोलिसांवर दगडफेक करून सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. 
याची फिर्याद पोलिस निरीक्षक के. एस. पुजारी यांनी उत्तर पोलिस ठाण्यात दिली. रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींची नावे 1) परमेश्‍वर भीमशंकर भरमदे 2) महादेव लक्ष्मण भरमदे 3) सिद्धाराम गुंडप्पा निंबाळे 4) शरण लक्ष्मण भरमदे 5) सुनील भीमाशंकर भरमदे 6) मल्लिनाथ शरणाप्पा खांडेकर 7) नागेश सुभाष पटणे 8) दत्ता श्रीमंत हुग्गे 9) सुभाष यमाजी 10) शरणु भैरामडगी 11) सुनील गाडीवडार 12) धुळप्पा नंदर्गी 13) मल्लिनाथ ढोंबरे 14) महेश सुतार 15) कल्याणी पोमाजी 16) शिवशंकर चितली 17) नागराज अप्पा मडडे 18) दीपक रामलिंग चितली 19) अंबादास कटकधोंड 20) म्हाळप्पा व्हनकोरे 21) बसबप्पा शिरगण 22) सिद्धाराम कलप्पा शिरगण 23) शिवराज चितली 24) महादेव खांडेकर 25) शरणाप्पा लक्ष्मण भरमदे 26) श्रीशैल भरमदे 27) तिप्पय्या इरय्या स्वामी 28) विजयकुमार निंबाळे 29) सुनील भीमाशंकर भरमदे, 30) प्रभय्या मठपती, 31) नागनाथ सुतार 32) मल्लिनाथ धुळाप्पा शिरगण 33) परमेश्‍वर शिवलिंगप्पा माळी 34) शिवरत्न शिवानंद चितली, 35) हणमंत नागप्पा मुंजळकर 36) सिद्रामप्पा इराप्पा बटगेरी 37) रवींद्र घोळसगाव 38) मलप्पा निरोळी 39) शिवपुत्र धड्डे 40) शैलेश चितली 41) सिद्धाराम लक्ष्मण भरमदे 42) प्रभाकर गंगाराम भैरामडगी 43) शिवपुत्र शिरगण (पुजारी), 44) शिवराज चित्तली व अन्य अज्ञात 100 (सर्व रा. वागदरी, ता. अक्कलकोट) अशी आहेत. 

वागदरी येथे श्री परमेश्‍वर देवस्थानची यात्रा ही गुढीपाडव्यानंतर पाच दिवस दरवर्षी चालते. यंदा कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सर्वत्र झाल्यामुळे राज्यातील सर्व धार्मिक स्थळे, जत्रा, यात्रा व मोठी गर्दी करण्यास शासनाने बंदी घातलेली आहे. महाराष्ट्रात संपूर्ण राज्यभर संचारबंदी लागू केलेली आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी यात्रा न भरवणे, विधीच्या वेळेस मोठी गर्दी न करता निवडक लोकांनी पूजा करण्याबाबतची सूचना केलेली होती. त्यास देवस्थान कमिटीने मान्यता दिली होती. रविवारी पूजा केल्यानंतर रथोत्सव कार्यक्रम करण्यासाठी तरुणांनी प्रयत्न सुरू केले. त्या वेळेस पोलिसांनी युवकांच्या जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्या युवकांनी पोलिसांवर दगडफेक करून पोलिस उपनिरीक्षक के. एस. पुजारी यांच्यासह पोलिस हेडकॉन्स्टेबल बाबूराव करपे, पोलिस कॉन्स्टेबल सीताराम राऊत, प्रमोद शिंपाळे, होमगार्ड रमजान शेख अशा पाच जणांना जखमी केले होते. त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. संचारबंदी मोडून मोठा जमाव गोळा करणे, परवानगी नसताना रथोत्सव करण्याचा प्रयत्न करणे, पोलिसांवर दगडफेक करणे व गर्दी गोळा करून संसर्गजन्य रोगाचा प्रसार करणे, स्वतःसह इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणे आदी आरोप संशयित आरोपींवर ठेवण्यात आले आहेत. त्यांच्यावर उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संशयित आरोपींवर भादंवि कलम 353, 332, 333, 143, 147, 149, 186, 188, 269, 270, 504, 506 महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1), (3)/135, 139, साथीचे रोग अधिनियम 1897 चे कलम 2, 3, 4, महाराष्ट्र कोविड 19 चे कलम 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सहायक पोलिस निरीक्षक श्री. नाळ तपास करीत आहेत.