Solapur Crime:'बार्शीत दीड लाखांचा गुटखा पकडला'; दोघांवर गुन्हा, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
Huge Gutkha Haul in Barshi: अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांच्या पथकाने गुरुवारी बार्शी येथे कारवाई केली. या पथकाने बार्शी येथील लता टॉकीज शेजारील मे. ए. एच. ट्रेडर्स व गणपती मंदिराजवळ असणाऱ्या मे. गजानन ट्रेडर्स या दोन दुकानांवर धाड टाकली.
FDA officers in Barshi displaying seized gutkha packets worth ₹1.5 lakh during the raid.sakal
उ.सोलापूर : अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने बार्शी येथे दोन दुकानावर धाड टाकली. या कारवाई दीड लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणात दोन व्यापाऱ्यांसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.