
Flood-hit Solapur: 150 localities submerged, officials inspecting affected areas.
Sakal
सोलापूर : सोलापूर शहरात बुधवारी रात्रभर पावसाने झोडपले. शहर व हद्दवाढ भागातील साधारण १५० नगरांमधील रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले होते. शेळगी, मित्रनगर, विडी घरकूल, २५६ गाळा, कवितानगर आदी भागातील घरांमध्ये नाल्याचे पाणी शिरले. शहरात ७१ ठिकाणी लोकांच्या घरांत पाणी शिरले. घरात पाणी घुसल्याने प्रभाग क्र. १, २ व प्रभाग १०, ११, १२, २४, २५, मध्ये जनजीवन विस्कळित झाले.