
Police recover six stolen motorcycles and arrest 16-year-old teen in Solapur.
Sakal
सोलापूर: पहिल्यांदाच शहर पोलिसांच्या रेकॉर्डवर आलेल्या १६ वर्षीय मुलाने अवघ्या एक-दीड महिन्यात शहरातून सहा दुचाकी चोरल्या. चोरीच्या दुचाकीतील पेट्रोल संपल्यावर तो तेथेच टाकून दुसरी दुचाकी चोरत होता. त्याला जेलरोड पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने पकडले आहे.