
सोलापूर : पोलिसांना खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोलापूर-कोल्हापूर रोडवरील कोरोली ब्रीजखाली साडेसतरा किलो गांजासह ओरिसा राज्यातील दोन तरुणांना जेरबंद केले आहे. ३० ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर यांना गांजा वाहतुकीसंदर्भात खबऱ्यांकडून खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई पार पाडली.