
सोलापूर : शहरात १७ सिंध प्रांतीय नागरिक असून ते भारत-पाकिस्तान फाळणीनंतर याठिकाणी रहायला आले आहेत. यांच्याकडे ‘लाँगटर्म व्हिसा’ (एलटीव्ही) असून ते दरवर्षी त्याचे नूतनीकरण करून घेतात. त्यांनी नागरिकत्वासाठी अर्जही केलेला आहे. ते पाकिस्तानी नसल्याने त्यांना परत पाठविण्याची आवश्यकता नसल्याचे शहर पोलिसांनी सांगितले.