

Birth–Death Department clears a massive backlog of 17,000 certificates in just 15 days after increasing manpower and cancelling staff leaves.
Sakal
सोलापूर: महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात मागील दहा महिन्यांपासून १७ हजार जन्म-मृत्यू दाखले विविध कारणास्तव प्रलंबित होते. ऑनलाइन प्रणाली असूनही दाखल्यांच्या मंजुरीसाठी विलंब होत होता. आयुक्तांचा पक्षपाती कारभार अन् अधिकाऱ्यांमधील नाराजी याचा थेट परिणाम कामावर झाल्यामुळे नागरिकांची अडचण होत होती. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर आरोग्य विभागाने कर्मचारी वाढवून, सुट्या रद्द करत कामात गती आणली आणि अवघ्या १५ दिवसांत १७ हजार प्रलंबित दाखल्यांचा विषय मार्गी लावला आहे.