सोलापूर विद्यापीठाचा 18 वा युवा महोत्सव मंगळवेढ्यात

तरुणाई जल्लोष असलेला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 18 महोत्सव मंगळवेढा येथील दलित मित्र कदम गुरुजी शास्त्र महाविद्यालयात 9 ते 12 ऑक्टोबर दरम्यान होणार.
Punyashlok Ahilya Devi Holkar Solapur University
Punyashlok Ahilya Devi Holkar Solapur UniversitySakal
Summary

तरुणाई जल्लोष असलेला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 18 महोत्सव मंगळवेढा येथील दलित मित्र कदम गुरुजी शास्त्र महाविद्यालयात 9 ते 12 ऑक्टोबर दरम्यान होणार.

मंगळवेढा - तरुणाई जल्लोष असलेला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 18 महोत्सव मंगळवेढा येथील दलित मित्र कदम गुरुजी शास्त्र महाविद्यालयात 9 ते 12 ऑक्टोबर दरम्यान होणार असल्याची माहिती संस्थाध्यक्ष अ‍ॅड सुजित कदम यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

यावेळी उपाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, सचिव प्रियदर्शनी महाडिक, संचालिका डॉ. मीनाक्षी कदम, तेजस्विनी कदम श्रीधर भोसले, राम नेहरवे, शिवाजी पाटील, यतीराज वाकळे, प्राचार्य रवींद्र काशीद, कल्याण भोसले, जयराम आलदर, अजित शिंदे, रमेश पवार, सुभाष बाबर आदी जण उपस्थित होते.

त्याबाबत अधिक माहिती देताना अध्यक्ष कदम म्हणाले यंदाच्या युवा महोत्सवासाठी विद्यापीठाकडे ज्या महाविद्यालयाचे युवा महोत्सवासाठी प्रस्ताव दिले त्या प्रस्तावाची विद्यापीठानेच्या समितीने पडताळणी केल्यानंतर मंगळवेढयातील दलित मित्र कदम गुरुजी शास्त्र महाविद्यालयास पसंती दिली. मंगळवेढ्यात होणारा हा दुसरा युवा महोत्सव असून यासाठी बाहेरगावावरून येणार्‍या विद्यार्थ्यी व प्राध्यापकासाठी निवासाची व्यवस्था असून 100 मोबाईल टॉयलेट 15 खासगी सुरक्षा रक्षक, पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. वैद्यकीय व्यवस्थादेखील करण्यात आले असून पावसामुळे कार्यक्रमात व्यत्यय वाॅटरफ्रूफ व्यासपीठासह प्रेक्षकांना निवार्‍याची व्यवस्था करण्यात आली. त्यामध्ये दलित मित्र कदम गुरुजी मुख्य रंगमंच,श्री संत दामाजीपंत शब्दांगण मंच,महात्मा बसवेश्‍वर ललित रंगावली, स्व. इंदिरा संभाजी कदम स्वरसाधना मंच असे व्यासपीठ तयार करण्यात आले. तर परिसरामध्ये विविध स्टॉलची देखील उभारणी करण्यात आली युवा महोत्सवाच्या देखरेखीसाठी विविध 56 समित्या कार्यान्वित करण्यात आल्या. दि. 9 ऑक्टोबर रोजी स. 10 वाजता या युवा महोत्सवाचे उद्घाटन आ. समाधान आवताडे, आ. शहाजी बापू पाटील व मा.आ.प्रशांत परिचारक यांच्या शुभहस्ते कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षेतेखाली दलित मित्र कदम गुरुजी मुख्य रंगमंचावर होणार आहे.

सदरचे कार्यक्रम स. 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत होणार असून त्यामध्ये लोकनाट्य -दलित मित्र कदम गुरुजी मुख्य रंगमंच, समूहगीत - स्व. इंदिरा संभाजी कदम स्वरसाधना मंच, कातरकाम बसवेश्‍वर ललित रंगावली, प्रश्‍नमंजुषा (लेखी) - महात्मा बसवेश्‍वर ललित रंगावली ,वक्तृत्व मराठी, हिंदी, इंग्रजी- संत दामाजी शब्दांगण मंच, काव्यवाचन - श्री संत दामाजी शब्दांगण मंच, भितीचित्रण -महात्मा बसवेश्‍वर ललित रंगावली, एकांकिका  - दलित मित्र कदम गुरुजी मुख्य रंगमंच, रांगोळी - ईनडोअर हॉल. 10 ऑक्टोबर रोजी शास्त्रीय नृत्य - दलित मित्र कदम गुरुजी मुख्य रंगमंच, सुगम गायम - स्व. इंदिरा संभाजी कदम स्वर साधना मंच, पथनाट्य - संस्था कार्यालयाशेजारी, स्थळचित्रण - महाविद्यालय परिसर, वादविवाद - संत दामाजीपंत शब्दांगण मंच, फोक आर्केस्ट्रा - दलित मित्र कदम गुरुजी मुख्य रंगमंच, शास्त्रीय सुरवाद्य - स्व. इंदिरा संभाजी कदम स्वरसाधना मंच, कथाकथन - संत दामाजीपंत शब्दांगण मंच, नकला - दलित मित्र कदम गुरुजी मुख्य रंगमंच, स्पॉट फोटोग्राफी - महाविद्यालय परिसर,एकांकिका (मराठी/ हिंदी) - दलित मित्र कदम गुरुजी मुख्य रंगमंच, मंगळवार 11 ऑक्टोंबर प्रश्‍नमंजुषा तोंडी - दलित मित्र कदम गुरुजी मुख्य रंगमंच, निर्मिती चित्र - संस्थाकार्यालयाशेजारी शास्त्रीय गायन - स्व. इंदिरा संभाजी कदम स्वरसाधना रंगमंच, व्यंगचित्रण -महात्मा बसवेश्‍वर ललित रंगावली, लघु नाटिका - स्व. दलितमित्र कदम गुरुजी मुख्य रंगमंच, शास्त्रीय तालवाद्य - स्व. इंदिरा संभाजी कदम स्वरसाधना रंगमंच, मातीकाम - महात्मा बसवेश्‍वर रंगावली,लोकनृत्य - दलित मित्र कदम गुरुजी मुख्य रंगमंच.बुधवार 12 ऑक्टोंबर रोजी - शहरातून शोभायात्रा काढण्यात येणार असून दुपारी सैराट फेम आर्ची उर्फ रिंकू राजगुरू हिच्या शुभहस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार असून अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या असून यावेळी प्र. कुलगुरू प्रा. डॉ. राजेश गादेवार कुलसचिव श्रीमती योगिनी घारे, वित्त व लेखा अधिकारी सीए श्रेणिक शहा हे उपस्थित राहणार आहेत. या युवा महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थाध्यक्ष अ‍ॅड. सुजित कदम व विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ कळवणे यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com