
सोलापूर : आषाढी एकादशीला विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने पायी येतात. वारकऱ्यांना भेसळमुक्त, स्वच्छ व ताजे अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासन दक्ष झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील दहा व शेजारच्या पुणे, सातारा व सांगली जिल्ह्यातील १० असे एकूण २० अन्न निरिक्षक आषाढीसाठी तैनात झाले आहेत. भेसळयुक्त अन्न ओळखण्यासाठी व रोखण्यासाठी हे पथक तैनात झाले आहे.