
उ. सोलापूर : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील मुस्लिम बांधवांकडून कुर्बानीसाठी मोठ्या प्रमाणात पशूंची खरेदी सुरू आहे. शहरातील एका व्यापाऱ्याने तब्बल २०० किलो वजनाचा बोकड खरेदी केला आहे. मध्य प्रदेशातील इंदोर जवळील देवास या गावातून हा बोकड खरेदी करून आणण्यात आला आहे. शहरात वेगवेगळ्या जातींच्या बोकडांची खरेदी करण्यात येत आहे.