मंगळवेढा तालुक्यातील 22 गावे तलाठी कार्यालयाविना

महसूल विभागाने महसूल सुविधा गावोगावी देताना 'सुंदर माझे कार्यालय' योजनेच्या माध्यमातून लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला.
Talathi Office
Talathi OfficeSakal
Summary

महसूल विभागाने महसूल सुविधा गावोगावी देताना 'सुंदर माझे कार्यालय' योजनेच्या माध्यमातून लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला.

मंगळवेढा - महसूल विभागाने (Revenue Department) महसूल सुविधा गावोगावी देताना 'सुंदर माझे कार्यालय' योजनेच्या (Sundar Majhe Karyalaya Scheme) माध्यमातून लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न होत असताना तालुक्यातील तब्बल 22 गावातील तलाठ्यांना (Talathi) स्वतःचे कार्यालय नसल्यामुळे कार्यालयासाठी जागा शोधण्याची वेळ आली.

अलीकडच्या दोन-तीन वर्षात महसूल विभागाकडून ग्रामीण भागातील जनतेला देण्यात येणारे सात बारा, आठ 'अ' व इतर दाखल्याबाबत महसूलच्या कामकाजाचे संगणकीकृत झाल्यामुळे शेतकऱ्यांना ऑनलाइन दाखले देण्यास सुरुवात झाली. ग्रामीण भागामध्ये या सेवेचा लाभ देण्यासाठी इंटरनेट सुविधेची आवश्यकता भासू लागली. परंतु, ग्रामीण भागातील बर्‍याच गावात बीएसएनएल व तत्सम मोबाईल सुविधेचा नेटवर्कचा अभाव असल्यामुळे अनेक तलाठ्यांना नेटवर्कसाठी मंगळवेढ्यातून इतर गावाचा कारभार करावा लागत असे. याचा काही गावातील शेतकऱ्यांना तलाठी मंगळवेढ्यात भेटत असल्यामुळे इतर दाखले काढणे सोयीचे होऊ लागले. परंतु, इतर खासगी कंपन्यांचे मोबाईल नेटवर्क ग्रामीण भागात मिळू लागले.

शिवाय 'सुंदर माझे कार्यालय' या संकल्पनेतून नियुक्त तलाठी त्याच्या गावातील कार्यालय थांबण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब समिंदर व तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी संबंधित तलाठ्यांना आपल्या गावाचा कारभार गावात थांबून देण्याच्या सूचना केल्यामुळे तलाठी आता गावगाड्यात दिसू लागले. व त्यांनी असलेल्या तलाठी कार्यालयाला रंगरंगोटी व महसूल खात्याच्या योजनेची माहिती देणारे फलक लावले.

शिवाय त्यांना आवश्यक असणारे सर्व उतारे व दाखले गावात देण्याची सोय केली आहे. परंतु, तालुक्यातील कागष्ट, सिद्धापूर, भाळवणी, डोंगरगाव, खोमनाळ, जुनोनी, नंदेश्वर, हुन्नर ममदाबाद (हु), मारापुर, दामाजीनगर, घरनिकी, मुढवी, लक्ष्मी, दहिवडी, बावची, हुलजंती, पाटकळ, हाजापूर, चोखामेळा नगर या 22 गावांमध्ये तलाठ्यांना स्वतःचे कार्यालय नसल्यामुळे इतर शासकीय व खाजगी जागेचा आधार घेऊन त्यांना ही सुविधा द्यावी लागत आहे. त्यांना स्वतचे कार्यालय उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे.

शासनाच्या आदेशाचे सुंदर माझे कार्यालय ही संकल्पना सध्या तालुक्यामध्ये प्रभावीपणे राबविण्यात आल्यामुळे ग्रामीण जनतेला त्यांना आवश्यक असणारे दाखले हे गावातच दिले जाते. जाण्याच्या सूचना दिल्या आहेत शिवाय 22 गावांना तलाठी कार्यालयासाठी निधी उपलब्ध करण्याबाबत प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आला आहे.

- स्वप्निल रावडे, तहसीलदार मंगळवेढा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com