
-राजकुमार शहा
मोहोळ: मराठा आरक्षणासाठी मुंबईला निघालेले मनोज जरांगे- पाटील यांच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी मोहोळ तालुक्यातून विविध वाहनांच्या माध्यमातून सुमारे 25 हजार मराठा कार्यकर्ते जाणार असून, बुधवारी काही कार्यकर्ते मार्गस्थ झाल्याची माहिती सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते संतोष गायकवाड यांनी दिली. दरम्यान तुळजापूर, धाराशिव, उमरगा, औसा आदी भागातून मुंबईकडे जाणाऱ्या कार्यकर्त्या साठी मोहोळ येथे 6 हजार पाण्याच्या बाटल्यांचे वाटप सुरू असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.