Barshi Crime: 'बार्शी-परंडा रस्त्यावरून पिकअपमधून ३० जनावरांची सुटका'; ४ मृत्युमुखी, गुन्हा दाखल

Animal Cruelty Case on Barshi-Paranda Road: रस्त्याच्या कडेला टेम्पो थांबवून अंधाराचा फायदा घेत ते पळून गेले. टेम्पो उघडून पाहिला असता ३४ जर्सी गायीची वासरे, एक म्हशीचे रेडकू दाटीवाटीने भरलेले होते. त्यापैकी गायीची चार वासरे मृतावस्थेत दिसली. तीस वासरांना नवकार गोशाळा, अलिपूर (ता. बार्शी) येथे सोडण्यात आले.
"Illegal Cattle Transport Caught in Barshi: 30 Cow Calves & Others Found Dead"

Police rescue 30 animals from pickup van on Barshi-Paranda road; 4 found dead, case registered.

Sakal

Updated on

बार्शी : बार्शी-परंडा रस्त्यावरून पिकअपमधून कत्तलीसाठी जनावरे जात असल्याची माहिती समजताच पोलिसांसह गोरक्षकांनी सापळा रचून टेम्पो अडवला. त्यात ३० जर्सी गायीची वासरे, एक म्हशीचे रेडकू तर ४ वासरे मृतावस्थेत आढळले. टेम्पो चालक, त्याच्या साथीदारावर बार्शी तालुका ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com