
सोलापूर: सोलापूर शहर व जिल्ह्यात एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अतोनात नुकसान झाले. या नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला पाठविला होता. शासनाकडून जिल्ह्यातील ३२ हजार ७६१ शेतकऱ्यांसाठी ४० कोटी ८७ लाख ९५ हजार ७५५ रुपयांची भरपाई प्राप्त झाली आहे. सध्या तहसील पातळीवर बाधित शेतकऱ्यांच्या याद्या करण्याचे काम सुरू आहे. लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाणार आहे.