Lok Sabha Poll 2024 : जाळलेल्या ईव्हीएममधील ४१० मते सुरक्षित; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

जिल्हाधिकारी आशीर्वाद : विधानसभा निवडणुकीत अधिक दक्षता
410 votes secured from burnt EVm Collector Kumar Ashirwad madha lok sabha election
410 votes secured from burnt EVm Collector Kumar Ashirwad madha lok sabha electionSakal

Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघातील सांगोला तालुक्यात बागलवाडी येथे युवकाने ईव्हीएम मशिन पेटविले. जळालेल्या ईव्हीएममध्ये ४१० मते असून ही मते सुरक्षित आहेत. मतांची साठवणूक कंट्रोल युनिटमध्ये होते.

त्या युवकाने बॅलेट युनिट जाळले, निवडणूक कर्मचाऱ्यांनी पाणी टाकून ही आग नष्ट केली. दुसरे मतदान यंत्र जोडून बागलवाडीतील मतदान प्रक्रिया पूर्ण केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

माढा लोकसभा मतदारसंघातील करमाळा शहरातील नगरपरिषद शाळा क्रमांक दोन येथील मतदान केंद्रावर एका तरुणाने सायंकाळी ५ च्या सुमारास मतदानाला आल्यानंतर ईव्हीएम मशिन व व्हीव्हीपॅट मशिन हातोडाने फोडण्याचा प्रयत्न केला.

यामध्ये व्हीव्हीपॅट मशिनचे नुकसान झाले असून कंट्रोल युनिट व बॅलेट युनिट सुरक्षित आहेत. त्या देखील युवकाला पोलिसांच्या ताब्यात दिले असून या दोन्ही घटनेतील व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांची तपासणी करणे शक्य होत नाही. त्यामुळे मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता आहे. या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम फोडण्याचा व जाळण्याचा प्रयत्न झाला.

आगामी विधानसभा निवडणुकीत अशा घटना घडू नयेत, यासाठी विशेष खबरदारी घेतली जाईल. काय उपाययोजना कराव्यात, मतदानाला आलेल्या मतदारांची तपासणी करावी का? याबाबत आम्ही चाचपणी करत आहोत.

दोन गावांचा बहिष्कार

सोलापूर मतदारसंघातील मनगोळी, भैरववाडी या दोन गावांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला. या गावात काही अपवाद वगळता मतदान झाले नाही. या गावातील मतदारांनी मतदान करावे यासाठी आम्ही तलाठ्यांच्या माध्यमातून प्रयत्न केले असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले. या गावांचा प्रश्‍न विधानसभा निवडणुकीपूर्वी सोडविला जाणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बागलवाडी येथे ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न झाल्यानंतर त्या ठिकाणी नवीन मतदान यंत्राच्या माध्यमातून उर्वरित मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. नवीन यंत्र जोडल्यानंतर आवश्‍यक ती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. मतमोजणी करताना जाळण्याचा प्रयत्न झालेल्या मतदान यंत्रातील मतांची मोजणी केली जाणार आहे.

— कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com