
"Floodwaters enter Solapur schools; mid-day meals disrupted and school supplies washed away."
esakal
सोलापूर: सीना नदीला महापूर आल्याने जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७२७ पैकी बार्शी, करमाळा, माढा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व मोहोळ या तालुक्यातील ४३१ शाळांमधील साहित्याचे नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांसाठीचा शालेय पोषण आहार, संगणक, पुस्तके पाण्यात वाहून गेली आहेत. या तालुक्यातील १८१ अंगणवाड्यांचीही अशीच दुरवस्था झाली आहे.