लोकअदालतीत ४५९९ प्रकरणे निकाली; न्यायाधीशांच्या मध्यस्थीने‌ पती-पत्नीचा तुटलेला संसार पुन्हा जोडला

लोकअदालतीतून न्यायाधीश संगिता शिंदे यांनी दोघांचेही समुपदेशन केले. भविष्याची सुखद वाट त्यांना दाखवून दिली. ते पती-पत्नी पुन्हा एकत्र येण्यास तयार झाले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. शब्बीर औटी यांनी त्यांचे अभिनंदन करीत वाद मिटल्याचे लिखित पत्र दिले.
lokadalat
lokadalatsakal

सोलापूर : विवाहानंतर एक मुलगी झाली, पण कौटुंबिक वादातून पती-पत्नीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यासंदर्भातील खटला कौटुंबिक न्यायालयात दाखल झाला. रविवारी (ता. ३०) लोकअदालतीच्या माध्यमातून न्यायाधीश संगिता शिंदे यांनी दोघांचेही समुपदेशन केले. भविष्याची सुखद वाट त्यांना दाखवून दिली आणि ते पती-पत्नी पुन्हा एकत्र येण्यास तयार झाले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. शब्बीर औटी यांनी त्यांचे अभिनंदन करीत वाद मिटल्याचे लिखित पत्र दिले.

जिल्ह्यातील प्रलंबित २४ हजार २२८ तर दाखलपूर्व ३४ हजार ३८३ प्रकरणांवर तडजोडीतून मार्ग काढण्यासाठी रविवारी जिल्हाभर लोकअदालत पार पडली. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने तयार केलेले ‘एकमुठ्ठी असमान’ या गीताने लोकन्यायालयाचे उद्‌घाटन झाले.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. शब्बीर औटी यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव नरेंद्र जोशी यांच्या नियोजनातून ही लोकअदालत यशस्वी झाली. सोलापूर जिल्हा न्यायालयातील पॅनलवर न्यायाधीश रेखा पांढरे, संगिता शिंदे, व्ही. आय. भंडारी, बी. सी. मोरे, यु. पी. देवर्षी, डी. आर. भोला, एस. पी. पाटील, डी. डी. कोलपकर यांनी उत्कृष्ट काम करीत अनेक प्रकरणे निकाल काढली.

लोकअदालत यशस्वी होण्यासाठी जिल्हा सरकारी वकिल प्रदिपसिंग राजपूत, सहायक संचालक उज्वला बळे, वकिल संघटना, पॅनलवरील विधिज्ञ, न्यायालयातील कर्मचारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाचे अधीक्षक मल्लिनाथ शहाबादे, सुनिता चोपडे, सचिन वडतिले, व्ही. आर. माळवदकर, ए. बी. शेख, व्ही. टी. शिंदे यांनी परिश्रम घेतले. पोलिस अधिकारी व अंमलदारांचीही मदत झाली.

लोकअदालतीबद्दल थोडसं...

  • एकूण प्रकरणे

  • ५८,६११

  • तडजोड-निकाली प्रकरणे

  • ४,५९९

  • न्यायाधीशांचे एकूण पॅनल

  • ३५

लोकअदालतीतील ठळक बाबी...

  • - कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश कविता ठाकूर यांच्या प्रयत्नातून ५० प्रकरणांवर यशस्वी तोडगा

  • - वाहन अपघातातील मयताच्या वारसाला न्यायाधीश रेखा पांढरे यांच्या माध्यमातून मिळाली २१ लाख रुपयांची भरपाई

  • - न्यायाधीश संगिता शिंदे यांच्या प्रयत्नाला यश अन्‌ साडेचार वर्षांपूर्वी दुरावलेले पती-पत्नी पुन्हा एकत्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com