

Pandharpur Crime 55 Year Old Woman Held for Allegedly Killing 70 Year Old Lover DNA Report Reveals Victim Identity
sakal
पंढरपूर: शंकरगाव (ता. पंढरपूर) येथे प्रेमसंबंधातून ५५ वर्षीय महिलेने ७० वर्षीय प्रियकराचा खून करून मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने विहिरीत टाकल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. डीएनए तपासणीनंतर तब्बल दीड महिन्यानंतर खुनाचा उलगडा झाला. डीएनए अहवाल हाती येताच अवघ्या १२ तासांत पोलिसांनी संशयित महिलेला अटक करून न्यायालयासमोर उभे केले.