

Traders unloading onion trucks at Solapur market yard; prices continue to fall despite reduced arrivals.
Sakal
सोलापूर: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील तीन दिवसांत ५७३ ट्रक कांदा आला आहे. बुधवारी १८९ ट्रक लाल तर आठ गाड्या पांढरा कांदा विक्रीसाठी आला होता. गतवर्षीच्या तुलनेत आवक खूप कमी असताना देखील भाव वाढलेले नाहीत. सध्या कांद्याला सोलापूर बाजार समितीत प्रतिक्विंटल अकराशे रुपयांपर्यंत सरासरी भाव मिळत आहे.