
Navnath Pol’s 4-acre banana farm yields ₹32 lakh income; 60 tons exported successfully despite natural calamity.
Sakal
चिखलठाण : अवकाळी पाऊस, वादळी वारा, अतिवृष्टी या संकटावर मात करत शेटफळच्या नवनाथ पोळ या तरुण शेतकऱ्याने चार एकर क्षेत्रावर निर्यातक्षम केळीचे भरघोस उत्पादन घेतले. केळीचा दर्जा उत्तम असल्याने सध्या २७ रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे. आतापर्यंत ६० टन केळीची निर्यात केली आहे. आणखी ६० टन उत्पादन अपेक्षित असून, चार एकर क्षेत्रामध्ये यातून ३२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.