

Disappointed maize farmers in Mangalvedha — lack of MSP centers forces them to sell produce below support price.
Sakal
- हुकूम मुलाणी
मंगळवेढा : तालुक्यातील मका उत्पादन शेतकऱ्यांना शासनाने हमीभाव केंद्र सुरू न केल्यामुळे अन्य व्यापाऱ्याकडून प्रतिक्विंटल सहाशे रुपयांचा फटका मका उत्पादक शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. अगोदरच अतिवृष्टीने बेजार झालेल्या शेतकऱ्यांना दरातही 600 रुपये मारल्यामुळे आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अशी अवस्था मका उत्पादक शेतकऱ्यांची झाली.