
-महेश पाटील
सलगर बुद्रुक :मंगळवेढा तालुक्यातील सिद्धापूर येथे पूल बांधकामासाठी साडेसहा कोटी एवढा निधी मंजूर झाला आहे. मंजूर झालेल्या या निधीमुळे या भागातील जनतेने पूल उभारणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून केलेला संघर्ष आणि पाठपुरावा अखेर या पूल बांधकामातून प्रत्यक्षात साकार होणार आहे. मंगळवेढा तालुक्यातील सामाजिक, राजकीय,व्यावसायिक तसेच धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे गाव असलेल्या सिद्धापूर येथील नागरिकांनी या पूलासाठी अनेक निवेदने तसेच मागण्या वेळोवेळी केल्या होत्या परंतु त्यांच्या मागण्यांना अखेर आमदार समाधान आवताडे यांनी आपल्या प्रयत्नांतून पूर्ण केले आहे.