Solapur News: काळ्या हळदीच्या अमिषातून अकलूजच्या श्रीमंत व्यक्तीची ६५ लाखांची फसवणूक! भिवंडीतील ६ संशयित जेरबंद

युरोपियन देशात मोठी मागणी असलेली काळी हळद स्वस्तात देतो, त्यातून कोट्यवधी रुपये कमावण्याची संधी असल्याचे अमिष देऊन अकलूज येथील पटेल नामक श्रीमंत व्यक्तीला जवळपास ६५ लाख रुपयाला गंडा घालणारी सहा जणांची टोळी ग्रामीण पोलिसांनी बुधवारी (ता. ८) जेरबंद केली.
Crime News
Crime News esakal

Solapur News : युरोपियन देशात मोठी मागणी असलेली महागडी काळी हळद स्वस्तात देतो, त्यातून कोट्यवधी रुपये कमावण्याची संधी असल्याचे अमिष देऊन अकलूज येथील पटेल नामक श्रीमंत व्यक्तीला जवळपास ६५ लाख रुपयाला गंडा घालणारी सहा जणांची टोळी ग्रामीण पोलिसांनी बुधवारी (ता. ८) जेरबंद केली. पोलिस यासंदर्भात आज (गुरुवारी) अधिक माहिती देणार आहेत.

अनेक दिवसांपासून अकलूज येथील पटेल यांच्या संपर्कात असलेले सहाजण बुधवारी तीन महागड्या चारचाकीतून त्यांच्या घरी आले होते. तत्पूर्वी, त्यांच्याकडून मोठी रक्कम घेऊन देखील त्यांनी काळी हळद अजूनपर्यंत दिली नव्हती.

तसेच काळ्या हळदीची जादू पाहण्यासाठी परदेशातून महागडा सूट खरेदी करावा लागतो. त्यासाठी ७० लाख रुपये लागतात, असेही त्या सहा जणांनी पटेल यांना सांगितले होते.

आणखी पैसे मागण्यासाठी ते सहाजण बुधवारी आले होते. त्यांनी व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून दोन-तीन डेमो देखील पटेल यांना दाखवले होते. काळी हळद हा मोठा पैसा कमविण्याचा मार्ग असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

युरोपमध्ये त्याला मोठी मागणी असल्याचेही ते म्हणाले होते. काळी हळद एका ठिकाणी ठेवल्यावर त्यापासून बंद दरवाजाचे कुलूप आपोआप उघडते, असा व्हिडिओ देखील त्यांनी दाखवला होता. त्यांच्यावर विश्वास ठेवून पटेल नामक व्यक्तीने त्या सहाजणांना ६० ते ६५ लाख रुपये दिले होते.

पण, आपल्याकडे आणखी पैसे मागत असल्याने त्यांचा संशय बळावला व त्यांनी अकलूज पोलिसांना त्यासंबंधीची माहिती दिली होती. पोलिसांनी त्या सहाजणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता ते भामटे असल्याचे समोर आले.

त्यानुसार त्यांना अटक केले असून अधिक तपास अकलूज पोलिस करीत असल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

काळी हळदीच्या अमिषातून अनेकांना गंडा

काळी हळद ही दिव्य वस्तू असून युरोपात त्याला खूप मागणी आहे. महागड्या किंमतीत काळी हळद विकली जाते, असे सांगून अकलूज येथील एका श्रीमंत व्यक्तीला ६०-६५ लाख रुपयाला फसवणाऱ्या टोळीला ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले.

आता पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत किती लोकांना अशाप्रकारे फसवले आहे, हे तपासात समोर येईल, असेही अप्पर पोलिस अधीक्षक श्री. जाधव यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com