

Big boost for Solapur farmers massive ₹652 crore package for Rabi cultivation
Sakal
सोलापूर: ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी मदतीचे वाटप सुरू आहे. आता रब्बी हंगामात पेरणीसाठी राज्य शासनाने सोलापूर जिल्ह्यास ६५२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. जिल्ह्यात ७ लाख ८२ हजार १२७ शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार (३ हेक्टरपर्यंत) रुपये मिळणार आहेत.