

Solapur Municipal Corporation’s clean-up team removes 83 tons of garbage from 21 city locations using heavy machinery.
Sakal
सोलापूर : महापालिकेच्यावतीने १६ डंपर आणि १० जेसीबीच्या साहाय्याने शहरातील विविध २१ ठिकाणाचे ८३ टन आजोरा हटविण्यात आला. स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर या मोहिमेत अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात रस्त्यावरील पडलेला आजोरा, मलबा, बांधकामातील अवशेष, कचरा उचलण्याची विशेष मोहीम दर शुक्रवारी व शनिवारी नियमितपणे राबविण्यात येत आहे.