
जिल्ह्यातील ९३ हजार मुले कोरोनापासून सुरक्षित! २.३९ लाख मुलांनी लस घेतलीच नाही
सोलापूर : कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी केंद्र सरकारच्या परवानगीने १२ वर्षांवरील सर्वांनाच प्रतिबंधित लस टोचली जात आहे. सोलापूर शहर-ग्रामीणमधील दोन लाख ३३ हजार मुलांनी (१२ ते १८ वयोगट) लसीचा पहिला डोस घेतला असून त्यापैकी ९३ हजार मुलांनी दोन्ही डोस घेतले आहेत. प्रतिबंधित लसीच्या दोन्ही डोसमुळे कोरोना विषाणूची तीव्रता कमी होते, हा अनुभव असल्याने १२ ते १८ वर्षांतील मुले लस टोचून कोरोनापासून सुरक्षित होत आहेत.
हेही वाचा: विद्यापीठाची २५ मेपासून परीक्षा ऑफलाईनच! १५ मिनिटांचा ज्यादा वेळ
जिल्ह्यासाठी आतापर्यंत कोरोनावरील प्रतिबंधित कोविशिल्ड, कोवॅक्सिन, कोबॅव्हॅक्स लसीचे ५५ लाख १४ हजार ६५० डोस आले आहेत. त्यातील सध्या साडेतीन लाख डोस शिल्लक आहेत. तत्पूर्वी, जिल्ह्यातील १८ वर्षांवरील ३४ लाख १४ हजार ४०० तर १२ ते १७ वयोगटातील चार लाख ६९ हजार मुलांनी प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस घेणे अपेक्षित आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ३२ लाख २१ हजार २६ जणांनी पहिला तर २३ लाख ५४ हजार ६६३ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. लसीकरणामुळे कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसरी लाट अतिशय सौम्य स्वरुपाची राहिली. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिव्हिर याची गरज रुग्णांना भासली नाही. त्यामुळे लसीकरणासाठी गर्दीही वाढली, पण कोरोनाची तीव्रता व संसर्ग कमी झाल्यानंतर अनेकांनी लसीकरणाकडे पाठ फिरविली. आता जगातील काही देशांमध्ये चौथी लाट आली आणि दिल्लीतही रुग्ण वाढत असल्याने लसीकरणासाठी पुन्हा प्रतिसाद मिळू लागला आहे. तरीपण, दोन्ही डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झालेले तिसरा संरक्षित डोस घेत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. कोरोना कमी झाल्याने लस टोचून घेणाऱ्यांची संख्या कमी झाली आणि त्यामुळे लस वाया जाण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे.
हेही वाचा: आमदार प्रणिती शिंदे देणार विरोधकांना टक्कर! काँग्रेसचा विरोधक भाजप की राष्ट्रवादी?
५० टक्के मुलांचे लसीकरण नाहीच
१२ ते १८ वयोगटातील चार लाख ६९ हजार मुलांनी प्रतिबंधित लस टोचणे अपेक्षित आहे. त्यापैकी दोन लाख ३३ हजार जणांनी पहिला तर ९३ हजार मुलांनी दोन्ही डोस घेतले आहेत. अजूनही जिल्ह्यातील दोन लाख ३९ हजार मुलांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही. जिल्ह्यात सध्या कोबॅव्हॅक्सचे एक लाख ४७ हजार तर कोवॅक्सिनचे ७७ हजार ३०० डोस शिल्लक आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन थंडावलेल्या लसीकरणाला गती देण्याच गरज व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा: ५६ रुपयांच्या इंधनाची किंमत १२० रुपये। पेट्रोल-डिझेलवरील टॅक्स कोणी कमी करायचा?
जिल्ह्याची सद्यस्थिती
लसीकरणाचे एकूण टार्गेट
३८,८३,३७८
पहिला डोस घेतलेले
३२,२१,०२६
दोन्ही डोस घेतलेले
२३,५४,६६३
बुस्टर डोस घेतलेले
४८,८६९
लसीचे शिल्लक डोस
३,५४,४८०
Web Title: 93000 Children In The District Are Safe From Corona 239 Lakh Children Have Not Been
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..