
करमाळा : देवळाली (ता. करमाळा) ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच यांनी संगनमत करून ९६ लाख ६५ हजार ८९८ रुपयाचा अपहार केला. या प्रकरणी चौकशी समितीत दोषी ठरलेले ग्रामविकास अधिकारी अंगद लटके (रा. अंजनगाव खेलोबा, ता. माढा) व सरपंच प्रेमा अर्जुन जगताप (रा. देवळाली, ता. करमाळा) यांच्या विरोधात करमाळा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.