Solapur News : धक्कादायक ! महाविद्यालयीन तरुणीने संपविले जीवन

सोलापुरात शिकायला असलेल्या जळगावच्या २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी (ता. २६) रात्री दहाच्या सुमारास सत्यम चौकातील राज पॅलेसमध्ये ही घटना उघडकीस आली.
Solapur News
Solapur News sakal

सोलापूर : सोलापुरात शिकायला असलेल्या जळगावच्या २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी (ता. २६) रात्री दहाच्या सुमारास सत्यम चौकातील राज पॅलेसमध्ये ही घटना उघडकीस आली. दर्शना प्रवीण पाटील (वय २१, रा. ओम साई रेसिडेन्सी, जळगाव, सध्या रा. राज पॅलेस, सोलापूर) असे तिचे नाव आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

दर्शना ही वालचंद महाविद्यालयात अभियांत्रिकी तृतीय वर्षात शिकायला होती. ती राज पॅलेसच्या चौथ्या मजल्यावरील घरात भाड्याने राहण्यास होती. तिच्यासोबत राहणाऱ्या दोघी दुपारी गावी गेल्या होत्या. त्यानंतर रात्री तिच्या एका मैत्रिणीने तिला कॉल केला, मात्र, ती कॉल घेत नसल्याने ती नऊ वाजता तेथे पोचली.

Solapur News
Solapur News : अंमली पदार्थविरोधी कायद्याच्या खटल्यांसाठी विशेष सरकारी वकीलपदी संतोष न्हावकर यांची नियुक्ती

तिला कॉल केला, मात्र, ती कॉल घेत नसल्याने ती नऊ वाजता तेथे पोचली. मात्र, तिने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे तिने शेजाऱ्यांना सांगितले. त्यांनी पोलिसांना कळविले. रात्री दहाच्या सुमारास हेडकॉन्स्टेबल बी. बी. घुगे यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता तिने गळफास घेतल्याचे आढळून आले. तिने स्वयंपाकाच्या खोलीतील छताच्या पंख्याला नायलॉन दोरीने गळफास घेतला होता.

नायलॉन दोरीने गळफास घेतला होता. त्यांनी फास सोडवून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तिचा मृत्यू झाला होता. शवविच्छदेनानंतर तिचा मृतदेह तिच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. याची सिव्हिल पोलिस चौकीत नोंद झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com