esakal | मुख्यमंत्र्यांना चॅलेंज देणे भोवले! बार्शीच्या कार्यकर्त्यास सात दिवसांची पोलिस कोठडी
sakal

बोलून बातमी शोधा

Court

मुख्यमंत्र्यांना चॅलेंज देणे भोवले! बार्शीच्या कार्यकर्त्यास पोलिस कोठडी

sakal_logo
By
प्रशांत काळे

सतीश आरगडे (रा. तावडी) असे पोलिस कोठडी मिळालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. अजिंक्‍य पिसे यांनी आरगडे यांच्यासह पाच जणांवर बार्शी शहर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे.

बार्शी (सोलापूर) : ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर (Senior kirtankar Bandatatya Karadkar) यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी माफी मागावी, पंढरपूर येथे महापूजेला येऊ नये, मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात विश्व हिंदू परिषदेचे (Vishwa Hindu Parishad) पदाधिकारी, कार्यकर्ते पाय ठेवू देणार नाहीत, अशी माहिती पंढरपुरात प्रसिद्धी माध्यमांना देऊन चॅलेंज देणाऱ्या बार्शीच्या कार्यकर्त्यास बार्शी पोलिसांनी (Barshi Police) फसवणुकीच्या गुन्ह्यात संशयित आरोपी म्हणून अटक करून न्यायालयात उभे केले असता, न्यायदंडाधिकारी आर. एस. धडके यांनी सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. (A Barshi activist who challenged the Chief Minister has been remanded in police custody for seven days-ssd73)

हेही वाचा: 'उजनी' मायनस 23 वरून मायनस 6 टक्‍क्‍यांवर ! 45 दिवसांत 17.77 टक्के वाढ

सतीश आरगडे (रा. तावडी) (Satish Argade) असे पोलिस कोठडी मिळालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. अजिंक्‍य पिसे यांनी आरगडे यांच्यासह पाच जणांवर बार्शी शहर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे. बारामती सहकारी बॅंकेस जमीन तारण असताना बॅंकेचे लेटरपॅड, शिक्के, हरकत दाखला बनावट तयार करून कागदपत्रांच्या आधारे बेकायदेशीरपणे हस्तांतर दस्त तयार करून फसवणूक केली असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

विश्व हिंदू परिषद विभागमंत्री म्हणून कार्यरत असलेल्या सतीश आरगडे यांनी 14 जुलै रोजी पत्रकार भवन, इंदिरा गांधी चौक, पंढरपूर येथे प्रसिद्धी माध्यमांची बैठक घेतली. या वेळी जोगदंड महाराज (भक्ती मार्ग, पंढरपूर), भाग्यश्री लेणे, विश्व हिंदू परिषद जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र साळे (रा. इसबावी, ता. पंढरपूर), नितीन शिंदे उपस्थित होते.

हेही वाचा: "या' गोष्टी करा, मुलांना होणार नाही कोरोना! 101 वर्षांवरील चौघे कोरोनामुक्‍त

या वेळी आरगडे यांनी, महाराष्ट्र भूमी ही संतांची पवित्र भूमी आहे. पंढरपूर आषाढी वारीसाठी पायी चालत येण्याची परंपरा आहे. ही परंपरा सातशे वर्षांपासून चालत आली असून, इंग्रजांच्या काळातही खंडित झाली नाही. आघाडी सरकारने ही परंपरा खंडित करण्याचे पाप केले आहे. ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना नजरकैदेत ठेवले असून, त्यांना सोडून वारी करू दिली पाहिजे व मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी व प्रायश्‍चित्त म्हणून बंडातात्या कराडकर यांची माफी मागावी. एकादशीच्या महापूजेला येऊ नये, आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर विश्वहिंदू परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात पाय ठेवू देणार नाहीत, असे वक्तव्य करून इशारा दिला होता.

पंढरपूर पोलिसांनी (Pandharpur Police) बार्शी पोलिसांना ही माहिती कळवताच सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार यांनी आरगडे यांस फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक करून बार्शी न्यायालयात उभे करताच न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कट्टर कार्यकर्ता, बार्शी, तावडी येथे घर, मराठा आरक्षणमध्ये सक्रिय, एसटीची तोडफोड, जाळपोळ आदी कृत्याचे गुन्हे आरगडेवर दाखल असून कारवाई केली असल्याचा अहवाल पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी पोलिस अधीक्षकांना दिला आहे.

loading image