esakal | "या' गोष्टी करा मुलांना होणार नाही कोरोना! 101 वर्षांवरील चौघे कोरोनामुक्‍त
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

"या' गोष्टी करा, मुलांना होणार नाही कोरोना! 101 वर्षांवरील चौघे कोरोनामुक्‍त

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

शहर-ग्रामीणमधील कोरोना बाधितांची रुग्णसंख्या आता एक लाख 69 हजार 537 झाली आहे.

सोलापूर : शहर-ग्रामीणमधील कोरोना (Covid-19) बाधितांची रुग्णसंख्या आता एक लाख 69 हजार 537 झाली आहे. त्यामध्ये 1 ते 20 या वयोगटातील बाधित मुलांची संख्या आता 23 हजारांहून अधिक झाली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपूर्वी (Third wave of corona) ही धोक्‍याची घंटा समजली जात आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत बाधित मुलांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पालकांनी लसीकरण (Vaccination) करून घ्यावे आणि मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले जात आहे. (The number of children affected in the second wave has increased compared to the first wave in the corona-ssd73)

हेही वाचा: 23 ऑगस्टपर्यंत अकरावी प्रवेशाची सीईटी! "या' जिल्ह्यांमध्ये थेट प्रवेश

शहरातील 28 हजार 740 तर ग्रामीणमधील एक लाख 40 हजार 797 व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. त्यात शहरातील अंदाजित तीन हजार मुले तर ग्रामीणमधील 19 हजार 835 मुलांचाही समावेश आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसत नाही. पालकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याने मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यातून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण मिळेल, अशी भीतीही आरोग्य विभागाने (Department of Health) वर्तविली आहे. कोरोना हा लहान मुलांसाठी एवढा घातक नसेल, परंतु कोरोनातून बरे झाल्यानंतर दोन-तीन आठवड्यांपासून त्यांना अन्य आजारांना तोंड द्यावे लागत आहे. श्‍वसनसंस्था, रक्‍ताभिसरण, पचन संस्थेवर परिणाम होत असून मेंदूज्वरदेखील होत असल्याचे निरीक्षण आरोग्य विभागाने नोंदविले आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या कुटुंबातील मुले कोरोनापासून दूरच राहावीत, यादृष्टीने खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्याधिकारी डॉ. अरुंधती हराळकर यांनी केले आहे.

मुलांची "अशी' घ्यावी काळजी

  • दररोज सकाळी सूर्यनमस्कार, योगासन, सायकलिंग करावे

  • अंडी, मटण, डाळी, उसळी, सोयाबीनचा आहारात वापर असावा

  • घरातील ताजे अन्न खावे; स्वयंपाक केल्यानंतर किमान 50 मिनिटात जेवण करावे

  • पालकांनी स्वत:चे लसीकरण करून कुटुंब सुरक्षित करावे; मुलांना घेऊन विनाकारण घराबाहेर पडू नये

  • लठ्ठ, बारीक असलेल्या विशेषत: पूर्वीचे गंभीर आजार असलेल्या मुलांचे औषधोपचार नियमित सुरू ठेवावे

हेही वाचा: "सीटीईटी'साठी नोंदणी : जाणून घ्या कोण करू शकतात अर्ज

वयोगटानुसार बाधित मुले

  • 1 ते 10 वयोगटातील बाधित मुले : 5,933

  • 11 ते 20 वयोगटातील बाधित मुले : 16,402

  • 1 ते 20 वयोगटातील मृत्यू : 13

  • 101 वर्षांवरील चौघे कोरोनामुक्‍त

कोरोनाच्या दोन्ही लाटेतील बाधितांची संख्या पावणेदोन लाखापर्यंत असून मृतांची संख्याही साडेचार हजारांपर्यंत आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील 101 ते 110 वयोगटातील दोन महिला व दोन पुरुषांना कोरोनाची बाधा झाली होती. त्या चारही रुग्णांनी कोरोनावर मात करत घर गाठले. शंभरी पार करूनही जगण्याची जिद्द आणि कोरोनाला हरविण्याचे बळ, यातून त्यांनी कोरोनावर मात केली आहे. नियमित हलका व्यायाम आणि सकस आहार ही त्यांची जमेची बाजू होती.

घराबाहेर फिरणाऱ्यांकडूनच मुलांना कोरोना

शहरात 0 ते 15 वयोगटातील एक हजार 783 बालकांना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील तिघांचा मृत्यू झाला आहे. तर 16 ते 30 वयोगटातील सहा हजार 344 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. दुसऱ्या लाटेत विशेषत: घरातील कर्त्या पुरुषांच्या माध्यमातून (घराबाहेर जाणाऱ्या) कुटुंबातील चिमुकल्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदर्शनास आले आहे. ग्रामीणमध्ये 21 ते 30 वयोगटातील 29 हजार 911 तर 31 ते 40 वयोगटातील 29 हजार 381 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आले आहेत. कामानिमित्त तथा विनाकारण घराबाहेर फिरताना नियमांचे काटेकोर पालन न केलेल्यांनाच कोरोनाने गाठल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता तिसऱ्या लाटेत आपल्यामुळे घरातील कोणाला संसर्ग होणार नाही, याची खबरदारी त्यांनी घ्यावी, असेही आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

loading image