esakal | उजनी मायनस 23 वरून मायनस 6 टक्‍क्‍यांवर ! 45 दिवसांत केवळ 17.77 टक्‍क्‍यांनी वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

Ujani Dam

'उजनी' मायनस 23 वरून मायनस 6 टक्‍क्‍यांवर ! 45 दिवसांत 17.77 टक्के वाढ

sakal_logo
By
राजाराम माने : सकाळ वृत्तसेवा

उजनी धरणात समाधानकारक वाढ झालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेले आनंदाचे वातावरण हळूहळू चिंतेत बदलू लागले आहे.

केत्तूर (सोलापूर) : पुणे (Pune) जिल्हा व परिसर तसेच उजनी लाभ क्षेत्रातही मोठा पाऊस होत नसल्याने शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु रिमझिम पावसाने धरणाच्या साठ्यात वेगाने वाढ होईल, ही अपेक्षा मात्र फोल ठरली असली तरी, जलाशयाची पाणीपातळी वजा 23 टक्‍क्‍यांवर गेली होती ती पाणी पातळी आता सध्या मात्र 6 टक्‍क्‍यांवर आल्याने पावसाळा सुरू झाल्यापासून पाणीसाठ्यामध्ये जवळजवळ 17 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. उजनी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावल्याने उजनी धरणावर (Ujani Dam) अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. चालू पावसाळी हंगामाच्या सुरवातीच्या 45 दिवसांत उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या धरण साखळी क्षेत्रात 6529 मिलिमीटर तर उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 197 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मात्र उजनीत समाधानकारक वाढ झालेली नसल्याने शेतकऱ्यांत निर्माण झालेले आनंदाचे वातावरण हळूहळू चिंतेत बदलू लागले आहे. (The Ujani dam has accumulated only 17 percent water in 45 days-ssd73)

हेही वाचा: 23 ऑगस्टपर्यंत अकरावी प्रवेशाची सीईटी! "या' जिल्ह्यांमध्ये थेट प्रवेश

सद्य:स्थितीला उजनी धरणाची टक्केवारी तब्बल मायनस 23 टक्‍क्‍यांपर्यंत गेली होती. त्यात या वजा 17.77 टक्‍क्‍यांनी वाढ होऊन ती मायनस 6 टक्‍क्‍यांवर आली आहे. सध्या उजनी धरणात एकूण पाणीसाठा 490.540, 1708.25 दलघमी तर मृतसाठा मायनस 94.56 दलघमी तर टक्केवारी -6.00 एवढा नोंदवण्यात आला आहे. उजनीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 45 दिवसांत 6529 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, यामुळे उजनी धरणात यंदा पाणीसाठा होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. या पावसामुळे हवेतील उष्णता कमी होऊन आर्द्रता वाढल्यामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण 7.50 मिमीवरून ते 0.81 मिमीवर खाली आले आहे.

उजनी धरणाच्या वरील बाजूस असणाऱ्या 18 धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जरी पाऊस चालू असला तरी त्याचा फायदा अद्यापपर्यंत उजनी धरणाला झालेला नाही. दौंड (Dound) येथून खूप थोडा विसर्ग उजनीत येतो आहे, तर बंडगार्डन येथून आणखी विसर्ग सुरू झालाच नाही. उजनीच्या वरील बाजूस असणाऱ्या धरणांपैकी जवळपास पाच धरणे प्लस 50 टक्‍क्‍यांच्या पुढे आहेत, त्यामुळे पावसाचा सांगितलेला अंदाज आणि या धरणांची स्थिती याचा विचार केला असता व परतीच्या पावसाने दणका दिल्यास पुढील काळात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्‍यता आहे. मात्र सध्यातरी उजनी धरण मोठ्या पावसाच्या व विसर्गाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र दिसत आहे.

हेही वाचा: "या' गोष्टी करा, मुलांना होणार नाही कोरोना! 101 वर्षांवरील चौघे कोरोनामुक्‍त

पुणे जिल्हा परिसर तसेच भीमा खोऱ्यात जोरदार पाऊस झाल्यानंतरच उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरते. मात्र येथेही तुरळक प्रमाणात पाऊस होत असल्याने धरणात पाणी संथगतीने जमा होत आहे. गतवर्षी उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरणार नाही, अशी शंका होती. परंतु परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यामुळे उन्हाळ्यात पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांना कमी प्रमाणात त्रास सहन करावा लागला होता.

दरम्यान, उजनी जलाशयाच्या पाणीपातळीत वाढ होत असताना मोठ्या प्रमाणावर जलपर्णीही दाखल होत असल्याने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या जाळ्यामध्ये माशांऐवजी जलपर्णीच अडकत आहे. त्यामुळे मच्छीमार मात्र संकटात सापडले आहेत.

loading image