esakal | सोलापूर-मोहोळ महामार्गावर पेटली कार! गाडीमधील तिघे सुरक्षित
sakal

बोलून बातमी शोधा

सोलापूर-मोहोळ महामार्गावर पेटली कार! गाडीमधील तिघे सुरक्षित

सोलापूर - मोहोळ नॅशनल हायवेवरील हॉटेल धुलवडसमोर एका चालत्या कारने अचानक पेट घेतला.

सोलापूर-मोहोळ महामार्गावर पेटली कार! गाडीमधील तिघे सुरक्षित

sakal_logo
By
चंद्रकांत देवकते

मोहोळ (सोलापूर) : सोलापूर (Solapur) - मोहोळ (Mohol) नॅशनल हायवेवरील (National Highway) हॉटेल धुलवडसमोर एका चालत्या कारने अचानक पेट घेतला. चालकाच्या प्रसंगावधानामुळे व हॉटेल धुलवडचे मालक संजय क्षीरसागर यांच्या तत्परतेमुळे कारमधील तिघे बाहेर पडल्याने जीवित हानी झाली नाही व पुढील अनर्थ टळला. मात्र कारचे मोठे नुकसान झाले.

हेही वाचा: संसाराला 'सर्जा-राजा'चा हातभार! बालपणापासून सांभाळली बैलजोडी

सोलापूर - मोहोळ नॅशनल हायवेवर रविवारी (ता. 5) रात्री साडेसातच्या सुमारास हॉटेल धुलवडसमोर एका चालत्या कारने अचानक पेट घेतला. कार चालकाच्या प्रसंगावधानामुळे व हॉटेल धुलवडचे मालक संजय क्षीरसागर यांच्या तत्परतेमुळे पुढील अनर्थ टळला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अधिक माहीती अशी की, पंढरपूरहून सोलापूरकडे राहुल कराळे हे स्वत:च्या कारने (क्र. एमएच 42 के 8680) जात असताना हॉटेल धुलवडसमोर आल्यानंतर कार चालविणाऱ्या कराळे यांना गाडीच्या बॉनेटमध्ये वायरिंग जळाल्याचा वास येत होता अन्‌ धूरही येत असल्याचे लक्षात येताच त्यांनी कार थांबविली. त्वरित गाडीच्या खाली उतरत दोन व्यक्तींना बाहेर उतरविले. इतक्‍यात गाडीच्या इंजिनाने पेट घेतला. त्याक्षणी पेटलेल्या गाडीच्या विरुद्ध दिशेला असलेल्या हॉटेल धुलवडचे मालक संजय क्षीरसागर यांच्या निदर्शनास गाडी पेटल्याचे निर्दशनास आल्याने त्यांनी तत्काळ फोनवरून पोलिसांना याबाबतची माहिती दिली.

हेही वाचा: बोरगाव-घोळसगावच्या वाहत्या ओढ्याच्या पुलावरून जीवघेणा प्रवास!

यादरम्यान हॉटेल धुलवडचे मालक संजय क्षीरसागर व त्यांचा कामगार अरविंद माने, पोलिस सतीश पाटील, आजिनाथ काळे, होंडा शोरूमचा कर्मचारी फाटे यांच्या होंडा शोरूमचे कर्मचारी आदी उपस्थितांच्या मदतीने स्वतः बादलीने पाणी टाकत पेटलेली कार विझवण्यास मदत केली. गाडीचे अंदाजे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती गाडी मालकाने दिली असून, अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल अविनाश शिंदे करीत आहेत. कारचालकाचे प्रसंगावधान व संजय क्षीरसागर यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्याची चर्चा पेटलेली कार विझविण्याच्या प्रयत्न करण्याऐवजी मोबाईलद्वारे प्रत्यक्ष दुर्घटनेचे शूटिंग काढण्यामध्ये मग्न असलेल्या उपस्थितांमधून होत होती.

loading image
go to top