esakal | संसाराला 'सर्जा-राजा'चा हातभार! वडिलांनंतर बालपणापासून मुलाने सांभाळली बैलजोडी
sakal

बोलून बातमी शोधा

संसाराला "सर्जा-राजा'चा हातभार! वडिलांनंतर बालपणापासून मुलाने सांभाळली बैलजोडी

बालवयात तिघांना सोडून गेलेल्या वडिलांच्या पश्‍चात "त्या' चिमुकल्याने सर्जा-राजा या बैलजोडीचा सांभाळ केला.

संसाराला 'सर्जा-राजा'चा हातभार! बालपणापासून सांभाळली बैलजोडी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : बालवयात तिघांना सोडून गेलेल्या वडिलांच्या पश्‍चात 'त्या' चिमुकल्याने सर्जा-राजा या बैलजोडीचा सांभाळ केला. सर्जा-राजाची मेहनत आणि स्वत:ची जिद्द यातून पांडुरंग चंद्रकांत लांडगे (Pandurang Landge) याचा संसार सुखाने फुलला. मोहोळ तालुक्‍यातील (Mohol) सावळेश्‍वर हे गाव. साडेतीन ते चार हजार एवढी गावची लोकसंख्या. दहा-बारा वर्षांपूर्वी शेतीला आधुनिकतेची जोड नसल्याने उदरनिर्वाहापुरतीच शेती. जिल्हा परिषदेतील शाळेत प्राथमिक शिक्षण घेत असताना अचानक आई शाळेत आली. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. पांडुरंग हा त्या वेळी तिसरीत होता. त्याच्या खेळण्या-बागडण्याच्या वयात आईच्या डोळ्यातील त्या अश्रूचा अर्थ उमगला नाही. परंतु, घरी गेल्यानंतर वडिलांचे निधन झाल्याने सर्वजण रडत होते. शेती होती, परंतु बागायत नव्हती. चौथीत शिकत असलेला मोठा भाऊ, पाचवीतील बहिणीला सोडून वडील अनंतात विलीन झाले होते. त्या परिस्थितीत वडिलांनी सांभाळलेल्या सर्जा-राजाच्या जोडीचा त्यांना आधार वाटला.

हेही वाचा: जिल्ह्याला अजून हवेत 57 लाख डोस! 24.75 लाख व्यक्‍ती वेटिंगवरच

सहावीनंतर सर्जा-राजाच्या मदतीने बैलांच्या मेहनतीतून येणाऱ्या भाड्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू राहिला. आज त्यांच्या माध्यमातून तिघांचाही विवाह झाला असून घराचे बांधकाम होऊन सर्वांचा संसार सुखाचा झाला. त्याने अजूनही त्या बैलांची व्यवस्थित निगा राखत त्यांचा सांभाळ केला असून त्यांचे उपकार पांडुरंग विसरलेला नाही.

हेही वाचा: रशियाची "स्पुटनिक' सोलापुरात ! 82 जणांनी टोचला पहिला डोस

ठळक बाबी...

  • दुसऱ्याच्या शेतात बैल भाड्याने नेताना पांडुरंग जायचा वडिलांसोबत

  • बालवयातच त्याला शेती अन्‌ बैलांची लागली गोडी; वडिलांच्या निधनानंतर त्याने केला सांभाळ

  • बैलांच्या मेहनतीला अजूनही मागणी; मशागतीच्या भाड्यातून दररोज दोन-अडीच हजारांची कमाई

  • शेती मशागतीसाठी गावात 30 पेक्षा अधिक ट्रॅक्‍टर; तरीही पांडुरंग याने बैलांच्या मेहनतीलाच दिले प्राधान्य

लहानपणी वडिलांसोबत जात असल्याने मला बैलांची गोडी लागली. वडिलांच्या निधनानंतर कमाईचे दुसरे साधन नसल्याने त्यांचा सांभाळ केला. त्यांच्या मेहनतीच्या पैशातून कुटुंबाला मोठा हातभार लागला.

- पांडुरंग लांडगे, युवा शेतकरी, सावळेश्‍वर (ता. मोहोळ)

loading image
go to top