esakal | आमदार प्रणिती शिंदेंविरोधात गुन्हा! "हे' आहे खरे कारण
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Praniti Shinde

आमदार प्रणिती शिंदेंविरोधात गुन्हा! "हे' आहे खरे कारण

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

आमदार प्रणिती शिंदे, विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख, विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरे, तिरुपती परकीपंडला यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला.

सोलापूर : कोरोनाचा (Covid-19) वाढता प्रादुर्भाव पाहून शहरात जमावबंदीचे आदेश लागू आहेत. विनापरवाना सभा, मोर्चा, आंदोलन (Agitation) करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तरीही, बेकायदेशीरपणे विनापरवाना जमाव जमविला आणि सोशल डिस्टन्सिंग न ठेवता आदेशाचे उल्लंघन केले, या प्रकरणी आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) यांच्यासह कॉंग्रेस (Congress) पदाधिकाऱ्यांविरुद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. (A case has been registered against MLA Praniti Shinde for violating Corona rules-ssd73)

हेही वाचा: मुख्यमंत्र्यांना चॅलेंज देणे भोवले! बार्शीच्या कार्यकर्त्यास पोलिस कोठडी

इंधन दरवाढ, गॅसचे वाढलेले दर आणि महागाईच्या विरोधात विद्यार्थी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. 16) बोंबाबोंब आंदोलन केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतिकात्मक पोषाख घातलेल्या तरुणाच्या गळ्यात उद्योजकांचे फोटो अडकविले होते. दरम्यान, कोरोना या धोकादायक आजाराच्या विषाणूचा संसर्ग होऊन जनहित धोक्‍यात घालून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल, असे कृत्य यावेळी आंदोलकांकडून झाले. विषाणूचा प्रादुर्भाव होण्यास जाणीवपूर्वक कृत्य करून पोलिसांच्या कायदेशीर सूचनांकडे दुर्लक्ष केले. तुम्हाला काय करायचे ते करा, आम्ही बोंबाबोंब आंदोलन करणारच, अशी भूमिका आंदोलकांनी त्यावेळी घेतली. इंधन व जीवनावश्‍यक वस्तूंच्या दरवाढीतून सतत लूटमार होत असल्याच्या निषेधार्थ मोदी सरकारविरोधात यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी केली, असेही फिर्यादीत नमूद आहे. सदर बझार पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार शब्बीर तांबोळी यांनी त्यासंदर्भात पोलिसांत फिर्याद दिली. डफरीन चौकातील सुपर पेट्रोल पंपासमोर हे आंदोलन झाले होते.

हेही वाचा: "या' गोष्टी करा, मुलांना होणार नाही कोरोना! 101 वर्षांवरील चौघे कोरोनामुक्‍त

गुन्हा दाखल झालेल्यांची नावे

आमदार प्रणिती शिंदे, विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख, विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरे, तिरुपती परकीपंडला, मनोज यलगुलवार, नगरसेवक विनोद भोसले, सचिन गायकवाड, विकी वाघमारे, देविदास गायकवाड यांच्यासह विद्यार्थी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाल्याची नोंद सदर बझार पोलिसांत झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस नाईक देशमुख हे करीत आहेत.

आंदोलने होतात, मग व्यावसायिकांवरच निर्बंध का?

सत्ताधारी विरोधकांच्या निर्णयावर तर विरोधक राज्यातील सत्ताधाऱ्यांविरोधात वारंवार आंदोलन करीत आहेत. मागील वर्षभरात महिन्यात अनेक आंदोलने झाली आहेत. त्यावेळी कोरोनासंबंधीच्या सर्वच नियमांचे उल्लंघन झाल्याने वेळोवेळी आंदोकांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. मात्र, हजारोंच्या संख्येने आंदोलने होतात, मग हातावर पोट असलेल्यांचे व्यवसाय व डोक्‍यावर बॅंकांच्या कर्जाचा डोंगर झालेल्या व्यावसायिकांची दुकाने सुरू करण्यास परवानगी का दिली जात नाही, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

loading image