esakal | सोलापूरच्या पुनर्वसन विभागात दलालांचा सुळसुळाट ! 'पुनर्वसन'च्या उपजिल्हाधिकारी चव्हाणांविरुद्ध नाराजी
sakal

बोलून बातमी शोधा

सोलापूरच्या पुनर्वसन विभागात दलालांचा सुळसुळाट !

प्रकल्पग्रस्तांना मिळालेल्या जमिनीच्या खरेदी- विक्रीचे व्यवहार करण्यासाठी सोलापूरच्या पुनर्वसन विभागात दलालांची साखळी तयार झाली आहे.

सोलापूरच्या पुनर्वसन विभागात दलालांचा सुळसुळाट !

sakal_logo
By
भारत नागणे - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : प्रकल्पग्रस्तांना मिळालेल्या जमिनीच्या खरेदी- विक्रीचे व्यवहार करण्यासाठी सोलापूरच्या पुनर्वसन विभागात (Department of Rehabilitation) दलालांची (Brokers) साखळी तयार झाली आहे. या दलालांकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार केले जात आहेत. अशा वाढत्या प्रकारांमुळे पुनर्वसन विभागाच्या उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण (Mohini Chavan) यांच्याविषयी प्रकल्पग्रस्तांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत पिराची कुरोली (ता. पंढरपूर) (Pandharpur) येथील सुरेश लामकाने यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

हेही वाचा: फायर अलार्ममुळे टळली रेल्वे हॉस्पिटलमधील आगीची दुर्घटना!

सातारा, पुणेसह इतर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचे पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, माढा, करमाळा या भागात पुनर्वसन करून त्यांना जमिनींचे वाटप करण्यात आले आहे. दरम्यान, प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीच्या खरेदी- विक्रीच्या व्यवहारात दलालांची साखळी तयार झाली आहे. अशा दलालांकडून प्रकल्पग्रस्तांचा शोध घेऊन त्यांच्याकडून कमी किमतीत जमिनी खरेदी- विक्री व्यवहार करून दामदुप्पट दराने विक्री केली जात असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अशा दलालांमुळे सर्वसामान्य प्रकल्पग्रस्तांना व इतर शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दलालांच्या वाढत्या हस्तक्षेपाविषयी वारंवार तक्रारी करूनही काहीच कारवाई होत नसल्याने पुनर्वसन विभागातील

हेही वाचा: दगडू ते सुशीलकुमार अन्‌ कोर्टातील पट्टेवाला ते केंद्रीय मंत्री!

अधिकाऱ्यांविषयी आता नाराजी व्यक्त केली जात आहे.

अलीकडेच पिराची कुरोली (ता. पंढरपूर) येथील गट नं. 190 व 188-3 मधील जमीन प्रकल्पग्रस्त हणमंत महादेव देशमाने यांना मिळाली होती. त्याचा कब्जाही त्यांना देण्यात आला होता. दरम्यान, देशमाने यांनी ही जमीन जून 2020 मध्ये येथील शेतकरी सुरेश तुकाराम लामकाने व कुमार रामचंद्र लामकाने यांना बाजार भावाप्रमाणे विक्री केली. रीतसर खरेदी करून संबंधित शेतकऱ्याच्या ताब्यातही देण्यात आली. एक वर्षानंतर मात्र जमीन खरेदी व्यवहार अचानक रद्द केल्याचा आदेश पुनर्वसन प्रकल्पाच्या उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण यांनी काढल्याने लामकाने या शेतकऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. संबंधित शेतकऱ्यांना कोणतीही नोटीस अथवा पूर्वसूचना न देताच सातबारा उताऱ्यावरील त्यांची नावे कमी केल्याने या शेतकऱ्यांनी न्याय मिळवण्यासाठी थेट महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे धाव घेत मोहिनी चव्हाण यांच्याविषयी तक्रार केली आहे. या प्रकरणी पुनर्वसन विभागाच्या उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही शेतकरी सुरेश लामकाने यांनी महसूलमंत्र्यांकडे केली आहे. याबाबत अधिक माहितीसाठी पुनर्वसन विभागाच्या उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.

loading image
go to top