Solapur News : ढोक बाभुळगावच्या शेतकऱ्याची मुलगी झाली पोलीस उपनिरीक्षक

पूजा हिची महाराष्ट्र लोकसेवा का आयोगातर्फे सन 2020 साली घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे.
solapur
solapursakal

मोहोळ : माझ्या सारखे अनेक जण या क्षेत्रात येतील, ट्रेनिंग होईल नेहमी प्रमाणे शासकीय काम सुरू होईल. या सर्वाला मी अपवाद असणार आहे. माझ्या या पोलीस उपनिरीक्षक पदाचा उपयोग मला आदिवासी समाजाचे जीवनमान उंचावण्या साठी तसेच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी करावयाचा आहे असे मनोगत ढोक बाबुळगाव ता मोहोळ येथील शेतकरी कुटुंबातील पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या पूजा प्रकाश चव्हाण हिने केले.

ढोक बाभुळगाव येथील प्रकाश चव्हाण या शेतकऱ्याची मुलगी पूजा हिची महाराष्ट्र लोकसेवा का आयोगातर्फे सन 2020 साली घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. घरी जेमतेम दहा एकर शेती मात्र प्रकाश चव्हाण यांना शिक्षणाचे महत्त्व समजल्याने त्यांनी घरातील इतर कामे बाजूला ठेवून मुलांना शिक्षणाचे बाळकडू दिले. पूजाचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले, तर उच्च शिक्षण पुणे येथे झाले. ती अकराव्या रँक ने उत्तीर्ण झाली. शिक्षण घेताना भाऊ व आई-वडिलांची प्रेरणा मिळाल्याचे तिने सांगितले.

पोलीस उपनिरीक्षक पदी जरी निवड झाली असली तरी पुढे परीक्षा देत "क्लासवन्" होण्याचा मानस पुजा हिने बोलून दाखविला. आपल्या सर्वच समाजापैकी आदिवासी समाज अत्यंत गरीब आहे. त्यांच्याकडे फारसे कुणाचे लक्ष नाही. त्यांच्या दोन वेळच्या हातात तोंडाची गाठ पडणे ही मुश्कील आहे. त्या समाजासाठी मी योगदान देणार आहे, व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा माझा प्रयत्न आहे.

मुलगी पोलीस उपनिरीक्षक झाल्याचे समजताच आनंद गगनात मावेना, ती स्वतः कमवत शिकली आहे तिने आम्हाला टेन्शन दिले नाही. प्रकाश चव्हाण(वडील)

मी शेतात काम करीत होते. मुलीची निवड झाल्याचे समजताच समाधान वाटले. गावातील ती पहिलीच महिला अधिकारी आहे. तिने आमच्यासह गावाचे नाव उज्वल केले. सुनिता चव्हाण(आई)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com