मोबाईलवरील अश्‍लील व्हिडिओप्रमाणे शरीरसंबंधाचा पतीचा हट्ट! पत्नीची पोलिसांत धाव | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोबाईलवरील अश्‍लील व्हिडिओप्रमाणे शरीरसंबंधाचा पतीचा हट्ट! पत्नीची पोलिसांत धाव
मोबाईलवरील अश्‍लील व्हिडिओप्रमाणे शरीरसंबंधाचा पतीचा हट्ट! पत्नीची पोलिसांत धाव

अश्‍लील व्हिडिओप्रमाणे शरीरसंबंधाचा पतीचा हट्ट! पत्नीची पोलिसांत धाव

sakal_logo
By
अण्णा काळे : सकाळ वृत्तसेवा

करमाळा (सोलापूर) : पती मोबाईलवरील अश्‍लील व्हिडिओ पाहून मोबाईलवरील व्हिडिओप्रमाणेच शरीरसंबंध करण्याचा हट्ट करायचा. या प्रकाराला विरोध केला की मोबाईलवरील व्हिडिओप्रमाणेच शरीरसंबंध का ठेवू देत नाहीस म्हणून शिवीगाळ करून मारहाण करत होता. तसेच सासरकडील मंडळी मला नवीन घर घेण्यासाठी माहेरहून नऊ लाख रुपये घेऊन ये म्हणून शारीरिक व मानसिक त्रास देत असत. या कारणावरून माझा शारीरीक व मानसिक छळ केला असल्याची फिर्याद पीडित विवाहितेने करमाळा पोलिस ठाणे (Karmala Police Station) अंकित जेऊर दूरक्षेत्र येथे दिली आहे. त्यावरून गुन्हा (Crime) दाखल झाला आहे.

हेही वाचा: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीने केला डोक्‍यात पाटा घालून पतीचा खून!

याबाबत मिळालेली माहिती अशी की, विवाहित तरुणी ही पुरंदर तालुक्‍यातील नीरा येथील राहणारी आहे. हल्ली ती जेऊर (ता. करमाळा) येथे राहात आहे. फिर्यादीनुसार, फिर्यादी विवाहितेचा पती नीरा येथील एका कंपनीमध्ये नोकरीला आहे. त्यांचे लग्न झाल्यानंतर 15 दिवस व्यवस्थित नांदविले. त्यानंतर पती व सासू यांनी घरातील कामकाज व किरकोळ कारणावरून घालूनपाडून बोलणे व तुझ्या आई- वडिलांनी लग्नामध्ये पाहुणचार केला नाही, सोने कमी दिले, घरातील संसारोपयोगी वस्तू संपूर्ण दिलेल्या नाहीत, यावरून त्रास देण्यास सुरुवात केली. विवाहित पीडितेला तू या घरात राहायचे नाही, हे घर माझे आहे, असे म्हणून पती व मामांकडून धमकी दिली जात होती.

दरम्यान, नगर जिल्ह्यातील शिर्डीमधील व नाशिक (देवळालीगाव) येथील नणंद नीरा येथील घरी आल्यानंतर विवाहितेला म्हणायच्या, की तू मोकळ्या हाताने आमच्या घरी आलेली आहेस. तू तुझ्या आई- बापाकडून लग्नामध्ये काहीएक चीजवस्तू आणलेल्या नाहीस. आमच्या भावाला नवीन घर घ्यायचे आहे. त्यासाठी तू आई- वडिलांकडून नऊ लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून शिवीगाळ करून धमकी देत. पती व सासूला या दोन्ही नणंद या माझ्याशी व्यवस्थित वागायचे नाही, असे शिकवण देत असत. तसेच पती मोबाईलवरील अश्‍लील व्हिडिओ पाहून त्याप्रमाणे तो शरीरसंबंध करण्याचा हट्ट करीत असे. त्यास विरोध केल्यास त्या कारणावरून तो शिवीगाळ करून मारहाण करून मला वारंवार त्रास देत होता, असेही या फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचा: एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाला 'ब्रेक'! संपामुळे 315 कोटींचा फटका

पती व सासू यांनी उपाशी ठेवणे, माहेरहून फ्लॅट खरेदी करण्यासाठी नऊ लाख रुपये घेऊन ये असे म्हणून लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ करत होते. जाचहाट करून शिवागीळ व दमदाटी करून तुला सोडचिठ्ठी देतो असे म्हणून घरातून हाकलून दिले, असेही या फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून पीडित विवाहित महिला मार्च 2021 पासून आई- वडिलांकडे (जेऊर) राहात आहे. करमाळा पोलिस ठाणे अंकित जेऊर दूरक्षेत्र येथे रविवारी (ता. 21) गुन्हा दाखल झाला आहे.

loading image
go to top