esakal | मोहोळ येथे भुसंपादन कामासाठी कक्ष सुरु! नागरिकांची मोठी सोय
sakal

बोलून बातमी शोधा

सोलापूर: मोहोळ येथे भुसंपादन कामासाठी कक्ष सुरु

सोलापूर: मोहोळ येथे भुसंपादन कामासाठी कक्ष सुरु

sakal_logo
By
राजकुमार शहा

मोहोळ (सोलापूर): राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 मोहोळ-पंढरपूर-आळंदी पालखी मार्गासाठी मोहोळ तालुक्यातील 1 लाख 4 हजार 900 चौरस मीटर क्षेत्र संपादित होत आहे. तालुक्यातील बाधित खातेदारांच्या सोयीसाठी तसेच आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी तहसिल कार्यालय, मोहोळ येथे प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी व गुरुवारी भुसंपादन कामाकाजा साठी कक्ष सुरु करण्यात आला असल्याची माहिती मोहोळ चे प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली. या सुविधेमुळे नागरीकांचा वेळ व पैशात मोठी बचत होणार आहे.

हेही वाचा: पावसामुळे मोहोळ तालुक्यातील फळबागांचा बहार वाया जाण्याची भिती

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 मोहोळ -पंढरपूर-आळंदी पालखी मार्गासाठी मोहोळ तालुक्यातील मुख्य निवाड्यात 14 गटांचा समावेश असून, यामध्ये 63 हजार 597 चौरस मीटर क्षेत्र आहे. या बाधित क्षेत्राचा मोबदला 38 कोटी 33 लाख 18 हजार 841 इतका आहे. आतापर्यंत 14 गटातील 29 हजार 425 चौरस मीटर क्षेत्राचे 16 कोटी 45 लाख 27 हजार 771 रुपये बाधितांना देण्यात आला आहे, तसेच कायदेशीर बाबीमुळे चार गटांचा 17 हजार 898 चौरस मीटर क्षेत्राचा 11 कोटी 59 लाख 80 हजार 48 रुपये मोबदला रक्कम जिल्हा न्यायालय सोलापूर येथे वर्ग करण्यात आली आहे.

हेही वाचा: मोहोळ: लोकअदालतमध्ये अडीच कोटीची विक्रमी तडजोड

उर्वरीत 17 गटांची 16 हजार 247 चौरस मीटर क्षेत्राचा मोबदला 10 कोटी 28 लाख 11 हजार 22 रुपये रक्कम बाधितांना अदा करण्या बाबत कार्यवाही सुरु असल्याचेही प्रांताधिकारी गुरव यांनी सांगितले. पुरवणी निवाड्यामध्ये 34 गटांचा समावेश असून, 41 हजार 303 चौरस मीटर क्षेत्राचा मोबदला रक्कम रुपये 17 कोटी 81 लाख 94 हजार 629 रुपये इतकी आहे. मोहोळ तालुक्यातील पुरवणी निवाड्याच्या मान्यतेसाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणा कडे (ता. 23) सप्टेंबर 2021 रोजी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर तात्काळ संबधित खातेदारांना कळविण्यात येणार असल्याचे श्री.गुरव यांनी सांगितले.

मोहोळ शहरातील बाधित खातेदारांनी भूसंपादन कामकाकाजा साठी उपविभागीय कार्यालय पंढरपूर येथे न येता प्रत्येक आठवड्याच्या मंगळवार व गुरुवारी सकाळी 11.00 ते दुपारी 4.00 या वेळेत तहसिल कार्यालय, मोहोळ येथे भूसंपादन कक्षा सी संपर्क साधवा, असे आवाहन प्रांताधिकारी गुरव यांनी केले आहे.

loading image
go to top