उसाच्या फडात हलला पाळणा
उसाच्या फडात हलला पाळणा esakal

...अन् उसाच्या फडात हलला पाळणा

ऊसतोडणी मजूरांच्या खोपीत गोंडस परीला जन्म दिला आणि उसाच्या फडातच पाळणा हालला.
Summary

ऊसतोडणी मजूरांच्या खोपीत गोंडस परीला जन्म दिला आणि उसाच्या फडातच पाळणा हालला.

चिखलठाण (सोलापूर) : प्रसुती वेदनेने त्रस्त ऊसतोड मजूर महिलेसाठी आरोग्य परिचारिका देवदूत ठरल्या आहेत. दुर्गम परिसरात चार चाकी वाहनही लवकर पोहचणे शक्‍य नसल्याने ऊसतोडणी मजूरांच्या खोप्यात जाऊन नवजात बालकासह मातेचे प्राण परिचारीकेने वाचवले आहेत. या महिलेची नॉर्मल प्रसुती करण्यात यश मिळवले. ऊसतोडणी मजूरांच्या खोपीत गोंडस परीला जन्म दिला आणि उसाच्या फडातच पाळणा हालला.

उसाच्या फडात हलला पाळणा
चिखलठाण येथील शेतकऱ्याने खोडव्या ऊसात घेतले कोबीचे भरघोस उत्पादन

शेटफळ (ता. करमाळा) येथील वाहनमालक गणेश नाईकनवरे यांच्याकडे अहमदनगर जिल्ह्यातील आवणी (ता. शेवगाव) येथील गणेश भिवाजी बरडे हे पत्नी पुजासह ऑक्‍टोबर महिन्यात ऊसतोडणी करण्यासाठी आले आहेत. पुजाचे दिवस भरत आलेले असल्यामुळे गेले आठ दहा दिवस खोप्यावरच राहत होती. शुक्रवारी (ता.26) रोजी पहाटे पाच वाजल्यापासून पुजाला प्रसुती वेदना सुरू झाल्या. परंतु तिने इतर कोणाला सांगितले नाही. पाच वाजता पुरूष मजूर ऊस तोडणीसाठी गेले. सात वाजता महिला तोडणीसाठी निघाल्यावर तिने त्यांना सांगितले. एक महिला तिच्याजवळ थांबून बाकी महिला ऊसतोडणीसाठी गेल्या. नऊ वाजण्याच्या सुमारास तिला अतिशय तीव्र वेदना झाल्या. परंतु नॉर्मल प्रसुतीचे चिन्ह नसल्याने त्या महिलेने वाहनमालक नाईकनवरे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तिला जेऊर किंवा करमाळा दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी वाहनाची शोधाशोध केली. परंतु त्या दुर्गम भागापर्यंत जाण्याजोगे वाहन तातडीने उपलब्ध होईना. त्यांनी 108 नंबरवरून रुग्णवाहिकेसाठीही कॉल केला तोपर्यंत एखादे वाहन पाहण्यासाठी गावात आले.

उसाच्या फडात हलला पाळणा
चिखलठाण शिवारात 32 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळला

यावेळी गावातील आरोग्य उपकेंद्रात कोरोना लसीकरण सुरू होते. तिथे सेवेसाठी असलेल्या आरोग्यसेविका बी.व्ही. निर्मळ व आरोग्य सहाय्यक बी.एच माने यांना सांगितले. घटनेचे गांभीर्य ओळखून वाहन उपलब्ध होईपर्यंत तुम्ही मला तिथे घेऊन चला मी प्रयत्न करते असे त्या म्हणाल्या. नाईकनवरे यांच्या बरोबर थेट खोप्यावर गेल्या. महिलेची स्थिती अबनॉर्मल होती. बाळ गुदमरले होते त्या महिलेला धीर देऊन उपलब्ध साधनाच्या मदतीने आपले कौशल्यपणाला लावून नॉर्मल प्रसुती करण्यात त्या यशस्वी झाल्या. त्या लहान परीच्या रडण्याचा आवाज ऐकताच सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. वेळेत मदतीला आल्याबद्दल ऊसतोडणी मजूर दांपत्याने व वाहनमालकांनी दोघांचे आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com